जिजाऊ ज्ञान मंदिरात दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न

जिजाऊ ज्ञान मंदिरात दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न दि.16/08 शा. प्र.*राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह

बुलडाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट मध्ये कृष्ण जन्माष्टमी निमीत्त “दहीहंडी” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वेगवेगळी वेशभुषा केलेले विद्यार्थी, राधा-कृष्णाच्या वेशभुषेतील विद्यार्थी तसेच पालकांची उपस्थिती व विद्यार्थी-पालक-शिक्षक यांनी समवेत केलेला नृत्य सोहळा.सर्व प्रथम शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट, कर्मचारी, उपस्थित पालक व छोट्या राधा-कृष्ण वेशातील मुलांसमवेत कृष्ण प्रतिमा व दहीहंडीचे पूजन करण्यात आले. तदनंतर इयत्ता 3री, 4वी व 5वी च्या मुलींनी आकर्षक नृत्य सादर करत सर्वांची दाद मिळवली. दहीहंडी कार्यक्रमात सर्वच मुलांनी उत्स्फुर्त सहभाग घेवुन एकतेचे प्रर्दशन केले. कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे नृत्य, कला,आविष्कार आदीचा उत्साह व या उत्साहात शाळेच्या मुला-मुलींनी दहीहंडी चे तिन ते चार थर रचून दिलेली सलामी… शेवटी मुलींनी दहीहंडी फोडुन,आम्ही जिजाऊ च्या लेकी कुठेही कमी नाहीत ह्याचं प्रदर्शन केले. दहीहंडी कार्यक्रमानंतर गोपाळांनी जमा केलेला काला वाटप करण्यात आला.कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा. श्री. संदीपदादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन काँलेज मुले-मुली, शिक्षक-शिक्षीकेतर कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *