
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
पिंपळगाव सराई येथे भव्य मिरवणूक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपळगाव सराई येथे भव्य मिरवणूकीचे आयोजन मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमात *शिव सेना कि.से.जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गायकवाड* यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन हार व पुष्प अर्पण करुन करण्यात आले त्यानंतर मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली या उत्सवात मोठ्या संख्येत गावकरी महीला व मातंग समाज व सर्वच समाजातील लोक मोठ्या जल्लोषात अण्णाभाऊ साठे यांचा जय जय कार करत सामील झाले मिरवणूकीचे आयोजन मोठया दिमाखात केलेले दिसत होते यावेळी प्रमुख उपस्थितीत गावातील पंढरी तरमळे, विष्णु पाटोळे,राजुभाऊ खंते ,विठ्ठल टेकाळे ,विनायक सोनुने, संदिप ताठे, बाळु बिडवे,शुभम शेवाळे,मंगेश राऊत, गणेश दळवी अनिल गावंडे तसेच मुख्य आयोजन कर्ते गजुभाऊ गायकवाड ,व गावातील शेकडो नागरिक समाज बांधव उपस्थित होते
