विद्यापीठस्तरीय फेन्सिंग तलवारबाजी स्पर्धेत उद्यानविद्या.महाविद्यालयाची कु.गौरी बुदुकले हिने द्वितीय पारितोषिक पटकावून दिली

विद्यापीठस्तरीय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत उद्यानविद्या महाविद्यालयाची कु.गौरी बुदुकले हिने द्वितीय पारितोषिक पटकावून दिली महाविद्यालयाला यशाची शान

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंग


कृषी महाविद्यालय, नागपूर येथे दि.1 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन फेन्सिंग (तलवारबाजी) या क्रीडा स्पर्धेत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगांव जामोद येथील विद्यार्थिनी कु.गौरी बुदुकले हिने प्रभावी आणि कौशल्यपूर्ण कामगिरी करत द्वितीय पारितोषिक पटकावले.फेन्सिंग हा वेग, तंत्र, एकाग्रता आणि चपळतेचा खेळ असून या खेळात कु.गौरीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची आणि मानसिक दृढतेची झलक दाखवली. या लढतीदरम्यान तिने प्रतिस्पर्ध्यांशी जिद्दीने सामना करत दुसरा क्रमांक मिळवून आपले क्रीडा सामर्थ्य सिद्ध केले. तिच्या या यशामुळे संपूर्ण महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे. कु.गौरी हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, महाविद्यालय व्यवस्थापन आणि सर्व सहकाऱ्यांना दिले. या स्पर्धेमध्ये प्रा.कु.अनिता इंगळे यांनी मार्गदर्शन व संघव्यवस्थापकाची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली.सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.कृष्णरावजी इंगळे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.स्वातीताई वाकेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नितीन सातव, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई, प्राध्यापकवर्ग, क्रीडा अधिकारी व सर्व सहकाऱ्यांनी कु.गौरीचे विशेष अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कु.गौरी बुदुकलेने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल, असे प्रतिपादन संस्थेचे पदाधिकारी आणि प्राचार्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *