अन्नाभाऊ साठे यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात उत्साहात संपन्न

अन्नाभाऊ साठे यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात उत्साहात संपन्न

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाहा

प. भट ( ता.१ ऑगस्ट ) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिर स्कुल अँड ज्यू.कॉलेज प.भट मध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किशोर सिरसाट होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय कोथळकर होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर भाषणातून प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात शाळेचे प्राचार्य म्हणाले की, आन्नाभाऊ साठे हे एक बहुगुणी व्यक्तीमत्व होते. माणुसकी जपायची असेल तर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र वाचा. अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेमध्ये गेले असे असले तरी ते स्वयं अध्ययन करुन उच्चतम शिक्षिताला लाजवेल असे साहीत्य त्यांनी लिहून ठेवले आणि त्यांच्या दीड दिवसाच्या शिक्षणामध्ये कित्येक वर्षे लक्षात राहील असा इतिहास घडवला. सरकार विरोधात ठणकावून सांगणारे आन्नाभाऊ होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारला ठणकावून सांगितले की, ” ये आझादी झूटी है ! देश की जनता भुखी है!! तसेच अनेक साहीत्य लेखन केले. अण्णाभाऊ साठेना लाभलेल्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी 13 लोकनाट्य, 3 नाटके, 13 कथासंग्रह, 35 कांदबर्‍या, 1 शाहीरी पुस्तक, 15 पोवाडे, 1 प्रवास वर्णन ( माझा रशियाचा प्रवास), व चित्रपट कथा अशी साहित्यसंपदा निर्माण केली. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले त्यांच्या शाहिरी डफाने शिवरायांना रशिया पर्यंत पोहचवले. असा दृष्टा लेखक व संवेदनशील माणसाला आदरांजली वाचून वाहूया असे म्हणाले. कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रुपाली पाटोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल काळवाघे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *