जनता विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

जनता विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाहा

पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा), १ ऑगस्ट :जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव सराई येथे आज दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी क्रांतीकारक साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती व स्वातंत्र्य चळवळीचे महान नेता लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षपद आणि प्रमुख वक्त्यांची निवड विद्यार्थ्यांमधूनच करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कु. सायली खंडागळे तर प्रमुख वक्त्या म्हणून कु. प्रगती शिंदे या विद्यार्थिनींची निवड झाली होती. विशेष उपस्थितीत प्राचार्य प्रमोद ठोंबरे आणि शाळा पर्यवेक्षक संजय पिवटे यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाचे नियोजन गजानन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन कु. रिया देशमुख हिने तर आभारप्रदर्शन कु. सोनम मुकलवार हिने केले. एकूण ४२ विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला.प्रमुख वक्त्या कु. प्रगती शिंदे यांनी आपल्या भाषणात दोन्ही थोर नेत्यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, “टिळकांनी स्वराज्यासाठी तर अण्णाभाऊंनी समाजपरिवर्तनासाठी आपले जीवन समर्पित केले. उत्सव आणि कला या माध्यमांतून त्यांनी समाजाला जागृत केले. लेखणीचा प्रभावी वापर करताना टिळकांनी ‘केसरी’ तर अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यकृतीतून जनजागृती केली.”त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, “आजच्या दिवशी आपण या दोन महान व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया. टिळकांचे स्वराज्य आणि अण्णाभाऊंचे समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.”विद्यार्थ्यांच्या स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *