कॉंग्रेस चे निष्ठावंत मुस्लिम नेतृत्व म्हणून ओळख असलेले ‘हाजी दादू सेठ’

कॉंग्रेस चे निष्ठावंत मुस्लिम नेतृत्व म्हणून ओळख असलेले ‘हाजी दादू सेठ’ यांना डावलल्याने मुस्लीम समाजात नाराजीचा सूर.

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह

राजकारणात विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याची परंपरा आहे, सध्या जिल्ह्यात मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाला डावलल्या जात असल्याने समाजात नाराजीचा सूर उमटत आहे.नुकतेच काँग्रेस मध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेले मा.आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी नवीन प्रदेश कार्यकारणी गठीत केली आहे,यामध्ये जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कोणता ही पक्ष न बदलता,काँग्रेस चा विचार कायम ठेवत पक्षात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे जाहेद अली उर्फ हाजी दादू सेट यांना यामधून डावलण्यात आल्याचे चित्र आहे.जाहेद अली खान हे जिल्ह्या सह राज्य भर काँगेस पक्ष बळकटी कायम सक्रिय असतात, त्यांनी यापूर्वी प्रदेश सचिव म्हणून यशस्वी रित्या जबाबदारी पार पाडली,तसेच पुणे ग्रामीण प्रभारी म्हणून ही त्यांनी काम पाहिले, वासनिक यांचे अतिशय निष्ठावंत व पक्षाचे एकनिष्ठ नेते असून सुद्धा जर अश्या प्रकारे डावलल्या जात असेल तर विचार करावा लागेल अश्या प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत, जाहेद अली यांना मानणाऱ्या वर्गात प्रचंड नाराजी पसरल्याचे दिसत आहे. काँग्रेस चे जेष्ठ नेते मुकुल जी वासनिक यांचे अत्यांत निकटवर्तीय म्हणून जाहेद अली खान यांची ओळख आहे,आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे निस्वार्थ पने अगदी पक्षाच्या पडतीच्या काळात सबंध महाराष्ट्र भर पक्ष संघटन करण्याचे काम जिद्दीने चिकाटीने करत आहे.परन्तु अश्या निष्ठावंत नेत्याला निर्णय प्रक्रियेतुन डावलल्यामुळे आज मुस्लीम समाजा सह इतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे.असा अन्याय जर निष्ठावंतावर होत असेल तर जाहेद अली खान यांना आम्ही वेगळा विचार करण्यास भाग पाडू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.सपकाळ यांच्या या गटबाजी मुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांमध्ये यांचे परिणाम नक्कीच बघायला मिळतील. मुस्लिम नेत्यांना संधी न मिळाल्याने, अनेक सामाजिक संघटना आणि युवकांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे.मुस्लिम समाजाचे मताधिक्य असलेल्या भागांमध्येही नेत्यांना तिकीट न मिळणे, किंवा निर्णय प्रक्रियेत त्यांच्या भूमिकेला महत्त्व न दिले जाणे, ही गोष्ट समाजाच्या आत्मसन्मानावर घाला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.येत्या निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाचा हा रोष किती नुकसान दायक ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *