सरपंचावर अविश्वास ठराव परीतराजकीय क्षेत्रात उलथापालट होणार

अखेर पिंपळगाव काळे सरपंचावर अविश्वास ठराव परीतराजकीय क्षेत्रात उलथापालट होणार.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या 17 सदस्य संख्या असलेल्या पिंपळगाव काळे सरपंचावर 17 पैकी 14 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो अविश्र्वास आज 14 मतानी पारित झाल्या ने राजकिय क्षेत्र ढवळून निघाले. दुर्गा उमेश मांडवकर व इतर 13 असे एकूण 14 सदस्यांनी सरपंच सौ उषाताई सुरेश चौखंडे यांच्याविरुद्ध तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यची ची विशेष सभा आज दि. 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव काळे येथे तहसीलदार पवन पाटील यांचेअध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवली होती .सभेसाठी एकूण 17 सदस्यांपैकी 14 सदस्यांनी हातवर करून सरपंचाविरुद्ध मत दर्शविल्यानेअविश्वास ठराव पारित झाला. त्या मुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या वेळी 17 पैकी 14 सदस्यांनी आपले हात वर करून या ठरवा ला आपली संमती दिली या वेळी सरपंच ह्या ग्रामपंचायत बाहेर उपोषण मंडपात होत्या आता या ग्रामपंचायत चा कारभार कोणाला मिळणार या विषयी चर्चेला एकच उधाण आले. यावेळी तहसीलदार पवन पाटील, नायब तहसीलदार मयुरेश भुजबळ व अ . का.सत्यविजय जाधव ह्यां नी शासकीय काम पाहिले.पोलिस बदोबस्त कडक होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *