
दारू वरली मटका बंद साठी वंचित बहुजन आघाडी चा निवेदनातून आक्रोश
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
दिनांक 23 सात 2025 रोज बुधवार रोजी वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामोद च्या वतीने आणि तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वात माननीय ठाणेदार साहेब पोलीस ठाणे जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले आहे याची प्रतिलिपी उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद यांना सुद्धा देण्यात आली आहे. ग्रामपंचायत नाव पळशी इस्लामपूर वडगाव गड धानोरा या ठिकाणी माननीय सय्यद शेख साहेब यांची बीड आहे या बीडमध्ये सर्रास दारू वरली मटका हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत आहे त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या अति महत्त्वाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आज पोलीस ठाणे जळगाव जामोद येथे तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आक्रोश केला आहे. पळशी सुपो धानोरा वडगाव गड इस्लामपूर नाव पळशी येथील ग्रामस्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात निवेदनात सामील झाले होते. याआधी सर्व ग्रामस्थ तालुकाध्यक्ष रमेश नाईक यांना भेटून तेथील समस्या सांगितल्या होत्या आणि त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तालुकाध्यक्ष रमेश नाईक यांनी पोलीस ठाणे जळगाव जामोद येथे पक्षाच्या वतीने आक्रोश केला आहे. पोलीस प्रशासनाने याकडे काळजीने लक्ष द्यावे आपल्यावर सर्व जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास आपण संपादन करावा यासाठी आपण अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करावे. असे सुद्धा सांगण्यात आले. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष रमेश नाईक वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद. ज्येष्ठ नेते भिकाजी वानखडे , विजय तायडे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गवई जिल्हा सदस्य ,पार्वताबाई इंगळे जिल्हा नेत्या, साहेबराव भगत तालुका सचिव , युवा तालुकाध्यक्ष राजरत्न वाकोडे, शहराध्यक्ष आझम कुरेशी, , प्रवीण तायडे युवा शहराध्यक्ष, अताऊल्ला खान जिल्हा उपाध्यक्ष वंचित, जगदीश हातेकर तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, सुनिता हेलोडे महिला तालुकाध्यक्ष वंचित, प्रमोद कोकाटे तालुका उपाध्यक्ष दिलीप तायडे तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पारवे तालुका संघटक लोकपाल भगत तालुका संघटक राजेश तायडे तालुका उपाध्यक्ष प्रदीप मोरखडे, देविदास वानखडे सुदाम गवई, सुरेश वाघोदे तालुका संघटक महादेव बोदडे तालुका सचिव, मॅडी तायडे यशोदा धुरंदर निर्मलाबाई बिराडे यशोदा खराटे निर्मलाबाई खंडेराव चंद्रकला गुरचळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
