
दोन भाऊ एकत्र येणे हा महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षणच – दीपक राठोड मनसे जिल्हा उपाध्यक्ष
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
आताचे गलिच्छ राजकारण पाहता राजकारणामध्ये हे दोघे भाऊ एकत्र येणे हे काळाची गरज होती मराठी भाषेचा मुद्दा हे तर कारण ठरलं राजकारण हेच जर त्यांना करायचं असतं तर ते इतके दिवस थांबले नसते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोघ भाऊ एकत्र आले असते पण हे एकत्र येणं म्हणजे निखळ महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी आहे दोघ भाऊ एकत्र आल्याने फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किंवा शिवसेना उभाठाचे कार्यकर्तेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाला आनंदाचा क्षण निर्माण झालेला आहे या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र गेल्या कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होता हा क्षण काल पाच जुलै 2025 रोजी महाराष्ट्र ने ह्याची डोळा याची देही अनुभवला आहे गेल्या कित्येक वर्षाचा प्रतीक्षे नंतर काल फक्त राजकीय कार्यकर्तेच नव्हे तर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हा अत्यंत आनंद होता दोन्ही पक्षाची विचारसरणी व ध्येय सारख्या असल्याकारणाने हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची अत्यंत गरज होती आणि तसेच राज्यातील जनता आता या दोघ बंधूंच्या हाती सत्ता देऊन महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी संधी देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या विकासाला गती तर मिळणारच आहे तसेच अनेक क्षेत्रातून मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करतील की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला प्राधान्य मिळायला पाहिजे दोन्ही बंधू एकत्र येऊन बाळासाहेबांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे कोणी म्हणतो मराठीसाठी कोणी म्हणतो महानगरपालिकेसाठी पण राज साहेब आणि उद्धव साहेब हे महाराष्ट्र हितासाठी एकत्र आलेले आहेत या दोन्ही नेत्यांना एकत्र येण्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रचंड उत्साह व जोश संचारला आहे प्रत्येकाच्या मनात जो आनंद आज होत आहे तो आनंद कोणीही शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष दीपक राठोड बुलढाणा

जय महाराष्ट्र