उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने कृषि दिन सप्ताह सावरगाव येथे साजरा

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने कृषि दिन सप्ताह सावरगाव येथे साजरा…

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. सलंग्नीत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांच्या वतीने ग्राम सावरगाव येथे कृषि दिन सप्ताह साजरा करण्यात आला. त्या मध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले. दि. ०१.०७.२०२५ रोजी राज्याचे हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी बंधुचे पुष्प गुच्छा देऊन सत्कार करण्यात आले, दि.०२.०७.२०२५ रोजी गावामध्ये सेंद्रिय शेती व जैविक खते यांचे महत्व गावाचे विविध प्रगतशील शेतकरी व विद्यार्थ्यांच्या वतीने गावकऱ्याना पटवून देण्यात आले , दि. ०३.०७.२०२५ रोजी जैविक खतांचे चे मोफत वितरण विद्यार्थाच्या वतीने करण्यात आले . व तसेच शेतकऱ्यांना (Waste-decomposer) म्हणजेच जैविक बुरशी चे उपयोग व बनवण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आले. दि. ०४.०७.२०२५ रोजी सावरगाव येथे वृक्ष लागवड ही मोहीम राबवण्यात आली या मध्ये गावचे सरपंच सौ, मीनाक्षी अजय शेगोकार व गावकरी मंडळींचे विशेष मार्गदर्शन लाभले. वृक्ष लागवड मोहीम अंतर्गत विविध फळझाडे व इतर ही झाडांची लागवड ही गावाच्या सार्वजनिक परिसरात करण्यात आली.सदर उपक्रमाला उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. योगेश गवई सर, उपप्राचार्य श्री. सतीश धर्माळ सर. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे सर, विस्तार शिक्षण विभागाचे विषयतज्ञ प्रा जिव्हेश साळी सर, मृदा विज्ञान विभागाचे विषयतज्ञ प्रा. समाधान काळे सर आणि वनस्पति रोगशास्त्र विभागाचे विषयतज्ञ प्राध्यापिका प्रतिक्षा बोराखेडे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी प्रज्वल घाटे, महेश सैरिशे, राहुल पाटील, पवन क्षीरसागर, अंकित घोंगे, अथर्व नारखेडे व वेदांत म्हसाळ यांचे कार्यक्रम यशस्वीतेरीत्या पार पाडण्या करीता मोलाचे योगदान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *