
कृषिकन्यांनी दिले माती परीक्षणाचे नमुने गोळा करण्याचे प्रात्यक्षिक.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
जळगाव (जामोद) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित तथा सातपुडा शिक्षण संस्था संचालित स्वातंत्रवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील सातव्या सत्राच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कार्यानुभव अंतर्गत वडगाव पाटण शिवारात केले माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक.विद्यार्थीनींनी विषयतज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतातील विविध ठिकाणांहून मृदेचे नमुने घेतले. या प्रात्यक्षिका मागचा उद्देश म्हणजे शेतातील मृदेची पोत, पीएच, सेंद्रिय कर्ब, क्षारांचे प्रमाण, आम्लता, पोषणद्रव्यांची उपलब्धता इत्यादी घटकांची तपासणी करून, योग्य खत व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करणे होते. यावेळी विद्यार्थीनींनी शेतकऱ्यांशी संवाद साधून मृदा परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले व मृदास्वास्थ्य टिकवून, उत्पादन वाढवण्याचे उपाय सुचवले. कोणत्या मूलद्रव्यांची कोणत्या खनिजांची कमी आहे हे जाणण्यासाठी माती परीक्षण करणे फार महत्वाचे ठरते. यामुळे शेतकऱ्याचा पैसे वाचतो,श्रम, वेळ पण वाचतो. अशी माहिती विद्यालयाचे मृदा, विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागाचे प्राध्यापक समाधान काळे सर यांनी दिले.विद्यार्थिनींनी मातीचे नमुने गोळा करण्याची पद्धत गावकऱ्यांसमोर प्रात्यक्षिकरित्या करून दाखवली. तसेच वापरले जाणारे उपकरणे व निष्कर्षाचे महत्त्व समजावून सांगितले.हा कार्यक्रम प्राचार्य. योगेश गवई, कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोळे, प्रा.डव्हळे सर आणि विषय तज्ज्ञ समाधान काळे सर यांच्यामार्गदर्शनाखाली पार पडला.यावेळी गावकरी- शत्रुघ्न घुले, भानुदास घुले, सारंगधर घुले इ. हजर होते. यामध्ये नूतन डाखोरे, अनुष्का शिरसाट, जयश्री पवार,अपूर्वा भारसाकळे, निशा अकर्ते, भाग्यश्री निकम, अक्षदा महाल्ले, स्नेहा वाघमारे, तोमेश्वरी चुलपार, संजीवनी शिंगणे, खुशबू देशमुख, यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
