
शालेय उपयोगी साहित्या ची शाळेच्या आवारातून विक्री शिवसेनेचे गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी :- गौरव मेले
वरोरा :- अगदी काही दिवसात शैक्षणिक वर्ग सुरु होत असून काही खाजगी शाळा महाविद्यालयांनी शासनाच्या निर्देशांना बगल देत मनमानी कारभार सुरु केला आहे. काही शाळेनी शालेय उपयोगी साहित्य, वया, पुस्तके, युनिफॉर्म शाळेतूनच घेण्याचे बंधनकारक केले आहे. अश्या शाळेनवर कार्यवाही कारावी अश्या मागणीचे निवेदन शिवसेना उबाठा गटाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी वरोरा यांना देण्यात आले.काही शाळा आपला मनमानी कारभार करत अतरिक्त परीक्षा शुल्क व इव्हेंट फी पालकांच्या संमती शिवाय घेत असून ते थांबवावे,पालकांच्या तक्रारी साठी हेल्पलाईन नंबर तयार करावा,शाळेत प्रवेशा साठी डोनेसच्या नावाने अतिरिक्त फी घेतली जात आहे अश्या शिक्षण संस्थांनावर कार्यवाही करावी.शिक्षण विभागाने शाळेची नियमित तपासणी करून कामकाजाची पाहनी करावी अश्या मागण्याचे निवेदन शिवसेना उबाठा वरोरा ने दिले.शिक्षण हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे त्याचे अश्या प्रकारे व्यावसायिकरणं करुन पालकांची लूट करणे योग्य नाही. शासनाने शिक्षण सर्वसामान्या पर्यंत पोहचविण्याचे उद्दीष्ट ठरविले आहे काही शाळा हेच उद्दिष्ट उद्धवस्त करीत आहेत अश्या शाळा , महाविद्यालयावर कठोर कार्यवाही करावी.शाळा हया शिक्षण देणायचे केंद्र असावे अश्या प्रकारे व्यवसाय थाटता कामा नये.संबधीत विषयाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना स्टाईल समाचार घेतला जाईल त्यास शिक्षण विभाग जवाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देताना शिवशेना उप जिल्हा प्रमुख पंकज नाशिककर, वर्षां ठाकरे जिल्हा प्रमुख महिला आघाडी, नंदलाल टेंमुर्डे शिवसेना तालुका प्रमुख , हनुमान ठेंगणे आणि युवा सेने चे अभिजित कुडे, निखिल मांडवकर आदि उपस्तित होते.
