सर्वधर्मिय गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

सर्वधर्मिय गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वधर्मिय गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन मराठा सेवा संघाच्या वतीने २१ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. यासाठी पात्र गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावी, असे आवाहन मराठा सेवा संघ परिवार मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हा सचिव इंजि. सचिन तायडे यांनी केले आहे.मलकापूर तालुक्यातील इयत्ता दहावी परीक्षेत ८५ टक्के पेक्षा जास्त व बारावीच्या परीक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्वधर्मिय विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या, नामांकित विद्यालयात प्रवेश मिळालेले विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रासह क्रीडा, किंवा इतर क्षेत्रात प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचे आयोजन २१ जून रोजी करण्यात आले असून मलकापूर तालुक्यातील सर्व शाळांमधून सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची सद्यस्थितीतील माहिती प्राप्त केली आहे.तालुका निवासी मात्र काही कारणास्तव तालुक्याच्या बाहेर शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, निवासी पत्ता, मोबाईल नंबर मराठा सेवा संघ कार्यालय डवले कॉम्प्लेक्स हनुमान नगर रोड, विद्यार्थी किंवा पालकांना स्वतः येऊन देणे. शक्य नसल्यास त्यांनी उल्हासराव संबारे, संजय रहाटे, रविंद्र खराटे, विष्णू म्हैसागर यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन मराठा सेवा संघ परिवार मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हा सचिव इंजि. सचिन तायडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *