वामनराव तुर्के यांच्या वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रमाला धनादेश

वामनराव तुर्के यांच्या वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रमाला धनादेश

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी – गौरव मेले

वरोरा : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्या निमित्य वृद्धाश्रमात वामनराव तुर्के यांनी वृद्धाश्रमाला आर्थिक मदत देणार म्हणून घोषित केले होते. आज दिनांक १२ ला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन मंच मुंबई चे सक्रिय सदस्य तथा व्यवस्थापण परिषद समिती सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी विदयापीठ नागपूर वामनभाऊ तुर्के यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीपित्यार्थ सोनुताई येवले संचालिका राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रमाला २१ हजार चा धनादेश दिले. यावेळी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे संस्थापक प्राध्यापक संजयजी बोधे आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर किशोर डोमकावळे यांच्या उपस्थित देण्यात आले. याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य काळे, उपाध्यक्ष शिरीष उगे, प्रसिद्धी प्रमुख गणेश चिडे, आशिष मोंढे, खुशाल तुराळे, रवींद्र गावंडे, महेश लोंढे, आकाश ढवळे व समस्त अहिल्याभक्तांनी अभिनंदन मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *