अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी केला अंत्यविधी…

अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी केला अंत्यविधी…

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी. नागेश सुरगे

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील भिंगारा वनपरिक्षेत्रामध्ये दिनांक ११ जुन रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी ठाणेदार श्रीकांत निचळ,एपीआय नागेश मोहोळ,पीएसआय नारायण सरकटे, पोलीस नाईक शेख इरफान, पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पाहणी केली असता मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या संपूर्ण शरीरावर अळ्या पडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत पोलिसांनी घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद यांना बोलावून जागेवरच पीएम करण्यात आले.तसेच यावेळी घटनास्थळी फॉरेन्सिक युनिट बुलढाण्याची टीम दाखल झाली होती यामध्ये सहाय्यक रासायनिक मदतनीस पीएसआय राजेश बशिरे, सहाय्यक फोटोग्राफर अनिल चित्ते, महिला कॉन्स्टेबल वैशाली पवार, चालक हेडकॉन्स्टेबल युनुस खान तसेच यावेळी डॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले होते.वनविभागाचे चौकीच्या पाठीमागील वनांमध्ये एका झाडाखाली हा अनोळखी मृतदेह पडलेल्या अवस्थेत मिळुन आला होता.या अनोळखी मृतदेहाचे अंगात फुल बाह्याचे फिकट हिरवी टिशर्ट, भुरकट पांढऱ्या रंगाचा पॅन्ट, निळ्या रंगाची अंडरवियर, जवळ एक रुमाल पडलेला होता.हा मृतदेह जवळपास ८ ते १० दिवसांपूर्वीचा असावा असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा अनोळखी मृतदेहाचे अंत्यसंस्कार जळगाव जामोद येथील स्मशानभूमीत करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात एपीआय नागेश मोहोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *