छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर सुनगांव येथे संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर सुनगांव येथे संपन्न…

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सूरगे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे आयोजन सुनगांव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत दिनांक ४ जुन रोजी संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच रामेश्वर अंबडकार तर शिबीराचे उद्घाटन जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ संजय कुटे यांच्या सुनगांवचे ग्रामदैवत श्री आवजिसिध्द महाराज यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पवन पाटील, तालुका कृषीअधिकारी जाधव साहेब, भुमी अभिलेख चे गोसावी, आमदार डॉ संजय कुटे यांचे स्विय्य सहाय्यक निलेश शर्मा यांची उपस्थिती होती.यावेळी आ.डाँ.संजय कुटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराचे महत्त्व करून शासनाच्या विविध योजनांचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.. यावेळी वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले. या महाराजस्व शिबिरामध्ये संजय गांधी,श्रावणबाळ, पि.एम किसान. फार्मर आयडी, आधार दुरुस्ती, राशन कार्ड दुरुस्ती व नविन तयार करणे, वारस नोंदी, विविध तहसिल कार्यालयाचे दाखले, आयुष्यमान कार्ड, शेत रस्ते, आरोग्य शिबीर,जॉब कार्ड, नविन मतदार कार्ड बनविने, सलोखा योजना, फळबाग ‘ लागवड, सिंचन साधने, अश्या विविध योजनांचे टेबल या ठिकाणी लावण्यात आले होते. यामध्ये शेतकरी कार्ड ३१५, अतिवृष्टी ई केवायसी ९५, शेतीचे विविध दाखले वाटप १२२, पुरवठा संबंधित लाभार्थी २७, आधार दुरुस्ती व नोंदणी ८३, आरोग्य शिबिर लाभार्थी १३८, कृषी संबंधित ६८ लाभार्थी, संजय गांधी योजना लाभार्थी ५५, भूमी अभिलेख मालमत्ता पत्रक वाटप २० लाभार्थी, ग्रामपंचायत विषयी दिव्यांग अनुदान ७ लाभार्थी, विवाह नोंदणी ४, जॉब कार्ड १०, नमुना आठ- १०, शालेय साहित्य वाटप एससी एसटी लाभार्थी ९५ या राजस्व शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतल्याचे समाधान यावेळी तहसीलदार पवन पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनगांव तलाठी गौतम वाघ यांनी केले तर आभार तलाठी राकेश चवरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित आजी-माजी पदाधिकारी, शाळा समिती अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तहसील कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे, सर्व सेतू चालक,ग्रामपंचायत सचिव हितेंद्र जोशी व सर्व कर्मचारी, सर्व कोतवाल यांच्यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचेसह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह कृषी मित्र मोहनसिंह राजपूत यांनी परिश्रम घेतले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *