जिजाऊ ज्ञान मंदिरात महाराष्ट्र दिन मोठया उत्साहात संपन्न

जिजाऊ ज्ञान मंदिरात महाराष्ट्र दिन मोठया उत्साहात संपन्न

जावेद शहा बुलढाणा तालुका प्रतिनिधी

प.भट, दि.1 मे,राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलडाणा द्वारा संचालित, जिजाऊ ज्ञान मंदिर स्कुल अँड ज्यु.कॉलेज, पळसखेड भट मध्ये आज “महाराष्ट्र दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मा. गजानन भाऊ उबरहंडे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा, यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. अफसर चाचा, मा. देविदास सिरसाट, मा.भगवान गायकवाड, मा. सुनील जुंबड, मा. रमेश सुरडकर, शे. बब्बू, उषाताई फोलाने, मा. कविताताई खंडागळे, मा. जिवन सिरसाट, मा. दिपक म्हस्के, मा. वसुदेव बिलारी,मा. अनंता गीरी, मा. जिवन सिरसाट मा. विष्णू पाटोळे, मा. समाधान कोलते, मा. गजानन चिंचोले, मा. मनोहर सिरसाट यांसह बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती.*. *कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट म्हणाले की, शाळेत राबवले जाणारे उपक्रम “माझा वाढदिवस माझे झाड”, विवीध स्पर्धा परीक्षा, सैनिक रक्षाबंधन, स्नेह संम्मेलन, विज्ञान प्रदर्शन व आनंद मेळावा, विविध स्पोर्ट्स, समर कॅम्प, ॲडमिशन स्कॉलरशिप, प्लेन सायन्स व क्रॉप सायन्स यातून विद्यार्थी घडत आहेत. तसेच वर्ग 5 वी चे 10 पैकी 10 विद्यार्थी व 8 वी चे 24 विद्यार्थी स्कॉलरशिप परिक्षेस बसले होते त्यापैकी सर्वच म्हणजे 34 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तसेच यावर्षी 27 विद्यार्थी राज्यस्तरावर गेले ही अभिमानास्पद बाब असल्याचे म्हणाले.* *तद्नंतर “आनंद मेळावा” मध्ये विजयी स्टॉल ला ट्रॉफी वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक इयत्ता 11 वी च्या विद्यार्थिनींनी पटकावला तर द्वितीय क्रमांक इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनींनी मिळवला तर तृतीय क्रमांक हिमांशू किशोर तायडे याने मिळवला.शेवटी विद्यार्थ्यांच्या सत्राचा निकाल घोषीत करण्यात आला. निकाल घेण्यासाठी बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *