शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे जागेवर नसल्याने रिकाम्या खुर्चीला घातला हार

शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे जागेवर नसल्याने रिकाम्या खुर्चीला घातला हार.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

: बुलढाणा जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडेच्या सतत कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीला दिपक चांभारे पाटील शिवसेना उबाठा मलकापूर तालुकाप्रमुख व शिवसैनिकांनी हार घालून गांधीगिरी करीत आपला निषेध व्यक्त केला.मौजे शिराढोण ता. मलकापुर जि. बुलडाणा गट नं. ४९ जवळ मोहगंगा नदी पात्रामध्ये २०१९ मध्ये सिमेंन्ट क्रॉक्रेटचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्याचे पाणी नदीपात्रात तुंबल्यामुळे रस्ता बंद झाला होता, हा रस्ता सुरू करण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रचंड आंदोलन केल्यानंतर मे २०२३ मध्ये नदीपात्रामध्ये हयुम पाईप बॉक्स कल्व्हर्टचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले. बांधलेल्या पुलाचे काम हे कमी उंचीचे व त्यामध्ये टाकलेले सिमेंट पाईप हे लहान आकाराचे व दोनच पाईप टाकले आहेत. सदर बॉक्स कल्व्हर्टची रुंदी ही नदी पात्रा पेक्षा कमी असल्याने दि. १९ जुलै २०२३ रोजी मोहगंगा नदीला आलेल्या पहिल्याच पुरामुळे बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजुंचा ऑप्रोच खरडुन गेला व रहदारीचा रस्ता बंद पडला. याबाबत सदर कार्यालयास दि. २४/०७/२०२३ रोजी निकृष्ट कामाबाबत तक्रार अर्ज शेतकर्‍यांनी दिला व समक्ष भेट घेऊन प्रश्न मांडुन त्यावर बरेच वेळा चर्चा केल्यानंतर खरडलेल्या ठिकाणी तेथीलच बाजुची माती खोदुन रस्त्यामध्ये भराव टाकु रस्ता तात्पुरता रहदारीस सुरू करून दिला होता.वर्ष २०२३ मध्ये टाकलेल्या मातीचा भराव २०२४ च्या पहिल्या पावसत लगेच वाहुन गेला व रस्ता पुर्ण पणे परत बंद पडला याबाबत सदर कार्यालयास स्मरण पत्र देखील दिलेले आहे. तरी योग्य तो पक्का रस्त्याबद्दल कारवाई झालेली नाही. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांना शेतीचे अवजारे शेतात नेता येत नसल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल काढणीस येवून सुध्दा त्या मालाला घरी नेता आले नव्हते. काढणीस आलेला शेत माल हा अतिवृष्टीच्या मुसळधार पावसामुळे शेतमाल जागेवरच शेतात खराब झाला, तर काही शेतकऱ्यांचे सोयाबिन व मका हे मोहगंगा नदीचे पाणी व पुढे मिळणारी नळगंगा नदीला आलेले धरणाचे पाणी एकत्र होवुन त्या भागात महापुराचे स्वरूप आल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबिन व मक्का याचे पिक वाहुन गेल्यामुळे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.सदर नदीपात्रातील रस्त्याची रहदारी ही सुरळीत असती तर काढणीस आलेला शेत माल हा बऱ्या पैकी तयार होवुन शेतकऱ्यांचे नुकसान टाळता आले असते. परंतु मृद व जलसंधारण विभागाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षीतपणामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले व त्यांनी केलेली मेहनत व्यर्थ गेलेली आहे.तेथील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव शेवटी आत्महत्ये शिवाय पर्याय शिल्लक नाही असे देखील नमुद केले आहे. तरी शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळण्याकरीता बंद असलेला रस्ता चांगल्या दर्जाचा तत्काळ सुरू करून द्यावा तसेच झालेल्या नुकसानाची, नुकसान भरपाई द्यावी तथा संबंधीत कंत्राटदार व अधिकारी यांच्या वर कठोर कार्यवाही करावी.अन्यथा ग्रामस्थ व शिवसैनीक हे सदर तीव्र आंदोलन करतील व नंतरच्या परिणामास आपणच जवाबदार राहाल.असे निवेदन अमोल मुंडे बुलढाणा जिल्हा जल संधारण अधिकारी हे जागेवर नसल्याने निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांना देण्यात आले. तथा सुरेश बऱ्हाटे, राजेंद्र काजळे तालुका उपप्रमुख, पांडुरंग बऱ्हाटे, परशूराम बऱ्हाटे, ओंकार बऱ्हाटे, गोपाळ पाटील, सुनील विखारे, अजय विखारे, गणेश सुशीर, सतीश शेळके, प्रफुल वराडे, यांनी लोकशाही पद्धतीने गांधीगिरी करत रिकाम्या खुर्चीला हार घालत जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडेच्या यांचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *