भाजपा शहराध्यक्षपदी संतोष बोंबटकार तर तालुका अध्यक्षपदी संजय गावंडे यांची निवड

भाजपा शहराध्यक्षपदी संतोष बोंबटकार तर तालुका अध्यक्षपदी संजय गावंडे यांची निवड

बुलढाणा जिल्हा : प्रतिनिधी नागेश सुरंगे

भारतीय जनता पक्षाच्या मलकापूर शहर अध्यक्ष पदाकरिता संतोष बोंबटकर तर तालुका अध्यक्ष म्हणून संजय गावंडे यांची निवड करण्यात आली. भाजपा संघटनात्मक पातळीवर झालेल्या या निवडणुकीनंतर येथील भाजपा कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत भाजपा संघटनात्मक निवडणूक प्रमुख ज्ञानदेव मानकर व प्रदिप सांगळे यांनी ही घोषणा केली.यावेळी अमृत बोंबटकर, यश संचेती, मोहन शर्मा, मिलिंद डवले, अरविंद किनगे, रामभाऊ झांबरे, निलेश हिवाळे, संजयजी काजळे, चंद्रकांत वर्मा, विनोद आकोटकर आदींसह प्रदेशसदस्य जिल्हा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.निवडणुकीमध्ये प्रदेश या कार्यकारिणीमध्ये विविध पदांवर कार्यरत पदाधिकाऱ्यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदान करत ही निवडणूक पार पाडली. या निवडणुकीचा अहवाल बंद पाकिटामध्ये प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात आला आणि त्यानंतर लोकशाही पद्धतीने या शहराध्यक्ष पदाची निवड झाली असल्याचे मावळते शहर अध्यक्ष शंकर पाटील यांनी कळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *