
भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त बैठक संपन्न
जळगाव जामोद प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा विठ्ठल मंदिर संस्थांन व ब्राम्हण सभा यांच्या संयुक्त विदमाने “भगवान परशुराम जन्मोत्सव” मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी या मध्ये गीता भागवत, कीर्तन हे रोज हभप निलेश महाराज भुमरे याच्या प्रमुख उपस्थितितीत व मार्गदर्शना मध्ये त्याचे सहकारी करतील या मध्ये तालुक्यातील सर्व वारकरी, भजनी मंडळ सहभागी होणार भागवत रोज 1ते 5 या वेळेत होणार त्या नंतर कीर्तन हे संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत श्री विठ्ठल मंदिरात होणार आहे तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समिती च्या वतीने करण्यात आले आहे तसेच महाप्रसाद व भगवान श्री परशुराम यांच्या शोभा यात्रेला सुद्या सर्व समाजातील नागरिक उपस्थित रराहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे तसेच कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी ही बैठकअसल्याचे समितीच्या वतीने सांगितले
