
वरली अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडक कारवाई…
जळगाव जामोद प्रतिनिधी…
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पिंपळगाव काळे येथे दिनांक ८ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका वरली बहादरास मुद्देमालासह अटक केली आहे. पिंपळगाव काळे येथे आठवडी बाजार सार्वजनिक ठिकाणी वरली मटका जुगार पैशाच्या हार्दिक वर खेळत व खेळवीत आहे अशा गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या पथकाने धाड टाकून आरोपी शालिग्राम राजाराम राऊत वय ६० वर्ष राहणार पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद त्याच्या ताब्यातून अंगझडती दरम्यान नगदी ९३१०रूपये तसेच मटका जुगाराचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, एक डॉट पेन एक जुना वापरता ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे १० हजार रुपये, असा एकूण हे कॅल्क्युलेटर किंमत शंभर रुपये असा एकूण १९ हजार ४१५ रूपयांचा जुगार मुद्देमाल मिळून आला. आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून जळगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आरोपीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एजाज खान, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र अंभोरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश वाघ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
