मलकापूर शहर बनले आर्थिक गुन्हेगाराची केंद्र

मलकापूर शहर बनले आर्थिक गुन्हेगाराची केंद्र — नटवरलाल यांनी व्यापाऱ्यांना करोडोंनी गंडवले पोस्टेला राज्यातून व इतर राज्यातून तक्रार दाखल

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

मलकापूर: शहरात जग्गू डॉन, डॉ. पप्पू यासारख्या आर्थिक फसवणूक गुन्हेगारानंतर आणखी एक लीलाधर राठी उर्फ “नटवरलाल” यांने मां सचीया ट्रेडिंग कंपनीच्या नावाने शेकडो युवा उद्योजक व व्यापाऱ्यांकडून करोडो रुपयांचा माल खरेदी करून परतावा न देता गंडवले असल्याचे प्रकार शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी उघडकीस आणले. गंडवलेल्या व्यापारी उद्योजक यांनी मलकापूर ग्रामीण तथा शहर पोस्टेला विविध फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या. शिवसेना विभाग प्रमुख तथा युवा उद्योजक गणेश सुशीर याला “नटवरलाल” ने फसवल्याची बाब सुशीर याने दिपक पाटील यांना सांगितली असता या प्रकरणाच्या खोलात जाऊन दिपक पा. यांना कळाले की शेकडो व्यावसायिकांना या लीलाधर गोवर्धन राठी व त्याच्या परिवारातील काही सदस्यांनी गंडवले आहे. यात बळी पडलेल्या उद्योजकांना न्याय देण्याचा उठाव शिवसेनेने उभा केला. त्यानुसार सुनिता किरण जोशी, बारडोली गुजरात; कुणाल चंदूजी बांदुरकर, हरदा मध्य प्रदेश; अमोल रत्नाकर शेटे, बीड; शेख एजाज शेख मुश्ताक, छत्रपती संभाजीनगर; ज्ञानदेव तुकाराम सातव, वाघुळ; गणेश रामभाऊ सुशीर तथा राहुल चोपडे गावंडे दोघे दुधलगाव; योगेश कोकाटे, उमाळी यांनी मलकापूर शहर तथा ग्रामीण पो. स्टे. ला हजर राहून त्यांच्यासोबत झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटना सन्माननीय ठाणेदार यांना सविस्तर सांगितल्या. तसेच शैलेश लीलाधर राठी व त्यांच्या कुटुंबातील काही सदस्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या शिवाय ठाणेदार माननीय गणेश गिरी तथा ठाणेदार हेमराजजी कोळी यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करून न्याय देण्याचे आश्वासन उपस्थित सर्व व्यापारी उद्योजकांना दिले. याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख राजेंद्र काजळे, तालुका संघटक अक्षय रायपुरे, शाखाप्रमुख जुबेर भाई, नासिर भाई, प्रथमेश पाटील व इतर शिवसैनिक तथा व्यापारी हजर होते.Boxयानंतर आमच्या कोणत्याही व्यापारी, शेतकरी, शेतमजुर बंधूंची अशी आर्थिक फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. म्हणूनच आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून प्रेरित होऊन हा लढा उभा केला आहे. ज्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, आमच्या शहरातील “नटवरलाल” ने शेकडो उद्योजक तथा व्यापाऱ्यांना करोडोंनी गंडवले आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही मलकापूर शहर तसेच ग्रामीण पो. स्टेला हजर झालो. राज्यातील तथा राज्याबाहेरील अनेक उद्योजक व व्यापारी यांनी रीतसर लेखी तक्रारी नोंदवल्या. याप्रसंगी सर्वांना आश्वस्त करतो की सर्वांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्व शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. तसेच आवाहन करतो की सर्वांनी कायद्यावर विश्वास ठेवावा आपल्याला न्याय नक्कीच मिळणार.– दिपक चांभारे पाटील तालुका प्रमुख शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *