गौलखेड गावात घरफोडी मात्र चोरांना जावं लागलं रिकाम्या हाती

गौलखेड गावात घरफोडी मात्र चोरांना जावं लागलं रिकाम्या हाती.

जळगाव जा:- गौलखेड गावातील तीन ते चार लोकांच्या घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाट व सामानाची झडती घेत दरोडेखोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला पण चोरांच्या हाती मात्र काहिच लागले नाही ‌त्यामुळे गावात मोठा दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेला चोरांना खाली हात जावे लागल्यांची घटणा गौलखेड येथे ५ मार्च रोजी मध्यरात्री घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाच मार्च च्या मध्यरात्री दुचाकीवरून तीन चोर तोंडाला मास बांधून रोड लगत असलेल्या वसंता भिडे यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांनी आतील कपाटाची व सामानाची त्यांनी झडती घेतली पण कपाटाच त्यांना कपड्या लत्या शिवाय त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.त्यामुळे चोरट्यांनी थेट गावात प्रवेश केला.गावाच्या आतीमध्ये रोड लगत असलेल्या वासुदेव घाईट,शामराव घाईट यांच्या कुलुप बंद घरासमोर थांबून घराचे कुलूप तोडले. घरातील सामानाची झडती घेतली परंतु येथेही त्यांच्या हाती काहीच लागले नाही.मोठी चोरी करण्याच्या इराद्याने या चोरांनी घरफोडी केली पण घरात त्यांना सोने चांदी पैसे इत्यादी स्वरूपातील कुठलीच वस्तू न मिळाल्याने चोरांना खाली हात वापीस जावे लागले. चोरांचा हा सर्व प्रकार गावातील संतोष पाटील यांच्या सी.सी.टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.गावात चोरांनी घरफोडी केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.पोलीस पाटील विजय घाईट यांनी सदर घटनेची माहिती जळगाव पोलीस स्टेशनला फोनद्वारे सांगितली. गावात याअगोदर कधीही घरफोडीची अशी घटना घडली नाही.प्रथमच अशा प्रकारे चोरांनी मध्यरात्री येवून घर फोडल्यांने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.[ तालुक्यात चोरीचे सत्र दिवसेंदिवस सुरूच आहे.चोरांनी फक्त रात्रीच नाही तर भर दिवसाही चोरी करण्याचा सपाटा सुरू केला आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर चोरांचा शोध लावणे, पोरीच्या घटना रोखणे, लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.जळगावचे तरूण तडफदार ठाणेदार श्रीकांत निचळ यावर काय ॲक्शन घेतात याकडे सर्व तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *