
भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचा जळगावात शिवसेना उबाठा च्या वतीने निषेध…
जळगाव जामोद प्रतिनिधी…राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचा जळगाव जामोद तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथील सभागृहामध्ये निवेदन करताना महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे अशी आवश्यकता नसण्याचे म्हटले होते त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्यावतीने जळगाव जामोद येथे घोषणाबाजी करत भैय्याजी जोशी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर राज्य सरकारची भूमिका काय व मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा आहे त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान होणे आवश्यक आहे असे शिवसेनेचे जळगाव जामोद तालुकाप्रमुख गजानन वाघ हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. या जोडे मारून निषेध आंदोलनाला शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील, जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक भाईजान, तालुकाप्रमुख गजानन वाघ, विधानसभा प्रमुख भीमराव पाटील, शहर प्रमुख रमेश ताडे, शरीफ कुरेशी,गजानन ढगे, विशाल ताकोते, कैलास राजपूत, संतोष डब्बे, फारूख भाई यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
