
रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत लक्ष्मण फासे यांचा जागीच मृत्यू.
जळगाव जा :- पिंपळगाव काळे येथून सायकलने घरी जात असताना नवीन पुनर्वसित गौलखेड गावठाणा जवळ रेतीने भरलेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दादुलगाव येथील लक्ष्मण फासे वय ५५ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चार मार्च रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास घडली. लक्ष्मण फासे हे दररोज सकाळ – संध्याकाळ दुध विकण्यासाठी पिंपळगाव काळे येथे जात असत.चार मार्च रोजी दुध विकून सायकलने आपल्या घरी जात असताना रात्री साडेनऊ च्या दरम्यान समोरून भरधाव वेगाने अवैध रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरने त्यांना उडवून दिले.उपचारासाठी त्यांना खामगावला घेऊन जात असतांनाच वाटेतच त्यांचा करून अंत झाला.अपघातस्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला असून अवैधपणे वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टर वर कार्यवाही झाली पाहिजे यासाठी दादुलगाव व आजूबाजूच्या गावातील मोठ्या प्रमाणावर लोक घटनास्थळी जमले होते. महसूल प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेत तात्काळ अपघात स्थळी दाखल झाले. अवैधपणे भरलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा करत ट्रॅक्टर पोलिस स्टेशन जळगाव जामोदला जमा केले. संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्णा नदी मधून अवैधपणे मोठ्या प्रमाणावर रात दिवसा रेतीची तस्करी होत असून महसूल प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. लक्ष्मण फासे यांच्या पच्छात अमोल व महिंद्रा (विवाहित) दोन मुले असून तीन मुली (विवाहित) तर पत्नी असा आप्तपरिवार आहे.लक्ष्मण फासे हे अतीशय प्रेमळ स्वभावाचे होते.तेवढाच त्यांचा जनसंपर्क होता.त्यांच्या अकाली अपघाती निधनाने परिसरातील गावात हळहळ व्यक्त होत आहे.
