पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार

प्रतिनिधी चिखली :- वडिलांच्या कष्टाची शेती मुलं सुनानी लाडीगूलाबी लावून बक्षीस पत्र करून घेतली उर्वरित शेती विकून मुलींनी सुद्धा पैसे काढून घेतमारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याने पोलीस व पत्रकार यांनी सदर वृद्धाला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल करून माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती दिली आहे.
ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना बोलावून सदर आजोबांची हकीकत सांगून पोलीस स्टेशन रायपूर चे ए एस आय अमोल घाटे, संजय चवरे, पत्रकार गणेश अंभोरे व अकील अहमद पत्रकार.यांच्या शिफारशी वरून क्षणाचा हि विलंब न करता वृद्धाश्रम च्या नियमानुसार प्रवेश अर्ज भरून त्या निराधार बेघर आजोबांना वृद्धाश्रमात आश्रय मिळून दिला आहे. वृद्ध आजोबा ना वृद्धाश्रमात आश्रय दिल्याने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *