युवकाची रेल्वेसमोर येऊन आत्महत्या नांदुरा स्टेशन जवळील घटना

युवकाची रेल्वेसमोर येऊन आत्महत्या नांदुरा स्टेशन जवळील घटना...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

अंदाजे २५ वर्षीय वर्षीय अनोळखी तरुणाने आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी नांदुरा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे समोर येऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी ६:३० पुर्वी घडली आहे. नांदुरा ५२३/६- डाऊन मेन लाईन वर मालगाडीच्या इंजिन समोर येऊन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी लोहमार्ग शेगाव पोलीस व नांदुरा येथील ओम साई फाउंडेशन ॲम्बुलन्स सह घटनास्थळी हजर झाले होते. मृतक तरूणाची ओळख पटलेली नसून मृत तरुण हा अंदाजे २५ वर्षाचा आहे रंग गोरा असून उंची पाच फूट मध्यम बांधा अंगात पोपटी रंगाचे शर्ट व काळा नाईट पॅन्ट असून मृतकाची ओळख पटविण्याचे

आवाहन पोलिसांनी केली असून मृतक तरुणाचे प्रेत मलकापूर येथील सरकारी दवाखान्यात शीतगृहामध्ये ठेवले आहे. तरुणाची ओळख पटल्यास सुनील कवळकार लोहमार्ग पोलीस शेगाव मोबाईल नंबर ९१४६७६०५२३ व विलास निंबोळकर ओमसाई फाउंडेशन मोबाईल नंबर ९४२२८८३९११ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *