डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित हॉर्टिकक्चर प्रदर्शनीला विद्यार्थ्यांची भेट

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित हॉर्टिकक्चर प्रदर्शनीला विद्यार्थ्यांची भेट हॉर्टिकल्चर दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय,

प्रतिनिधी जळगाव जामोद

जळगाव जामोद येथील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे हॉर्टिकल्चर (उद्यानविद्या) प्रदर्शनीला दि.14 व 15 फेब्रुवारी 2025 रोजी भेट दिली होती. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत उद्यानविद्या विभागामार्फत आयोजित हॉर्टिकल्चर प्रदर्शनीमध्ये विविध फळपिके, भाजीपाला पिके, फुलशेती व प्रांगणउद्यान, मसाला पिके, औषधी वनस्पती, सुगंधीद्रव्य वनस्पती इत्यादी पिकांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे.सदर भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी हॉर्टिकल्चर प्रदर्शनीमध्ये विविध उद्यानविद्या पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली लागवड, सिंचन व्यवस्थापन, काढणी पश्चात प्रक्रिया उद्योग उभारणी, अत्याधुनिक टिश्युकल्चर प्रयोगशाळा, हायटेक नर्सरी व्यवस्थापन, हरितगृह तंत्रज्ञान इत्यादी आधुनिक पद्धतीचे लाईव्ह डेमोस्ट्रेशन बाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला.सोबतच या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विद्यापीठातील विविध विषयांच्या तज्ञांसोबत प्रत्यक्ष हॉर्टिकल्चर प्रदर्शनीमध्ये संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यातून विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन मिळाले तसेच काही स्थानिक शेतकरी यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी सुद्धा आधुनिक शेती संदर्भात सविस्तर माहिती घेतली.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन फेरफटका मारण्याची संधी मिळाली तसेच पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करण्याचा अनुभव मिळाला. सर्व विद्यार्थ्यांना या अनुभवाचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल आणि हॉर्टिकल्चर प्रदर्शनीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा लाभ होईल आणि शेतकरी कसा समृद्ध व स्वयंपूर्ण होईल, याबाबत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी तत्परतेने सदैव प्रयत्न व कार्य करतील. असे प्रतिपादन कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी याप्रसंगी व्यक्त केले.कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयातील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी हॉर्टिकल्चर प्रदर्शनीला भेट देऊन आपला सहभाग नोंदविला. यादरम्यान विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील प्रा.प्रितेश वानखडे, प्रा.अश्विन भोपळे, प्रा.अमोल सौदागर, प्रा.धिरज भोपळे, प्रा.श्रीकांत वानखडे, प्रा.कु.मोहिनी सिरसाट, प्रा.कु.अनिता इंगळे, प्रा.कु.निक्की बनसोड, डॉ.निलीमा सदनशिव, प्रा.कु.प्रतिक्षा बोराखडे यांनी सुद्धा हॉर्टिकल्चर प्रदर्शनीमध्ये सहभाग नोंदवून उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *