काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांचा मलकापूर मध्ये स्वागत

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांचा मलकापूर मध्ये स्वागत

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांचे आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी शहीद श्री संजयसिंगजी राजपूत यांच्या स्मारकास अभिवादन करण्याकरता सायंकाळी 5:00 वाजता आगमन झाले त्यावेळी त्यांच्या सोबत धुळे ग्रामीण येथील माजी आमदार कुणाल बाबा पाटील तसेच मलकापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजेश एकडे साहेब उपस्थित होते त्यावेळी शाहिद श्री संजय सिंग यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली . त्यानंतर श्री संजय सिंह यांच्या घरी जाऊन त्यांच्या वीरपत्नी व वीरमाता यांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली त्यानंतर नगरसेवक बंडूभाऊ चवरे यांच्या निवासस्थानी पारिवारिक व शहर तथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मलकापूर मतदारसंघाच्या वतीने आमदार राजेश एकडे यांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धनदादा सपकाळ यांचा सत्कार केला त्यानंतर बंडूभाऊ चवरे परिवार च्या वतीने बंडूभाऊ चवरे व सम्यक चवरे यांनी पारिवारिक सत्कार केला, मलकापूर शहर व तालुका, नांदुरा शहर व तालुक्याच्या वतीने कुणालबाबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला, मलकापूर शरद पवार गट राष्ट्रवादी तर्फे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ रायपुरे यांनी व एस पी संभारे सर यांनी हर्षवर्धन दादाचा सत्कार केला त्यावेळी हर्षवर्धन दादा सपकाळ बोलताना सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे आश्वासन दिले व येणाऱ्या काळात काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी ग्वाही दिली त्यावेळी मलकापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष हाजी रशीदखान जमादार, श्यामभाऊ राठी, नांदुरा बाजार समितीचे सभापती भगवान धांडे, पदमराव पाटील, मंगलाताई पाटील ,प्रीती भगत, जावेद कुरेशी, बंडूभाऊ चौधरी, रमेशसिंह राजपूत, हिवाळे सर, उस्मान मास्टर ,पुरुषोत्तम झाल्टे, प्रवीण पाटील अनिल गांधी, ज्ञानू डांबरे, गोविंद रहाटे, सनाउल्लाखा जमादार, सोपान शेलकर, नंदूसिंह राजपूत, वाजिद खान , शिरीष डोरले, रईस जमादार,हरीष सिद्धीक सुपडू , , डॉक्टर सलीम कुरेशी, साजिद खान, फिरोज खान , जाकिर मेमन, सलिम एम एस, युसुफ खान, उस्मान खान, राजू जवरे, विनय काळे, राजू पाटील, बंडू चवरे , सम्यक चवरे, गोलू बांगडे, अजीज बागवान, अनिल मुंधोकार, गजूभाऊ सोनोने, , विलास खर्चे, विनायक देशमुख, अनिल भारंबे, गोळीवाले काका इत्यादि उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *