जळगाव जा,येनगाव येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण

जळगाव जा,येनगाव येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण,!!बस स्टँड ते गावापर्यंत रस्ता बांधकाम करा, या मागणी करिता ग्रामस्थांचे बस स्टँड वर आमरण उपोषण

प्रतिनिधी जळगाव जामोद

दिनाक 7/2/2025 रोजी जळगाव जा तालुक्यातील एन गाव येथील ग्रामस्थांचे रस्ता बांधकाम करा या मागणी करिता बस स्टँड उपोषण सुरू केले उपोषण पूर्वी गावातील अरविंद जानराव वयझोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जलगाव जा व जिल्हा परिषद विभाग बुलडाणा यांना दिनाक 6/2/2025 रोजी उपोषणाबाबत निवेदन सादर केले दिलेल्या निवेदनात एन गाव येथील बस स्टँड पासून गावापर्यंत गेल्या 12 वर्षापासून रस्ता झालेला नहीत्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्ता बनविण्यात यावा याकरिता वेळोवेळी निवेदन सादर केले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची आपल्या स्तरावरून कारवाई केली नाही तरी रस्ता तत्काळ बांधकाम करा अन्यथा,लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता असे असताना प्रशासनाने स्पष्ट भूमिका न घेतल्याने अखेर अरविंद वायझोडे यांना उपोषणास बसावे लागले आहे. सदर उपोषणास संपूर्ण गांवकर्याचा पाठिंबा आहे. तसेच आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक, युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, आदित्य प्रसेनजीत पाटिल, सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *