चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक..१ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक..१ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

जळगाव जामोद प्रतिनिधी…

पोलीस स्टेशन जळगाव जामोद हद्दीमध्ये दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतात जात असताना अनोळखी आरोपीने रस्ता अडवून मारहाण करून जमिनी शालू धम्मपाल दामोदर राहणार खेर्डा खुर्द यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम सोन्याची मनी असलेली पोत किंमत १८ हजार रुपये व एक मोबाईल हजार रुपये किमतीचा घेऊन पळून गेला होता. यामध्ये पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरोधात अप.नं ७०२/२०२४ कलम ३०९(६),११५(२) भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरीच्या घटनांची गंभीर दाखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वजी पानसरे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बीबी महामुनी यांनी चोरीच्या गुंडांचा सखोल तपास करणे व गुन्ह्यांची उकल करून आरोपीचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशित केले होते. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी यांच्या अधिनिस्त पोलीस अधिकारी यांचे स्वतंत्र पथक तयार करून जबरी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करून उकल तसेच आरोपीचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे बाबत सूचना केल्या होत्या. चोरीच्या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करून गुन्ह्यांमध्ये १ आरोपी व त्याच्या ताब्यातील मुद्देमाल पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव काजी मझहरोद्दिन झुबेरोद्दिन वय ३६ वर्ष राहणार राणी पार्क जळगाव जामोद येथील असून याच्या ताब्यातून सोन्याचे मनी वजन ६.९६० ग्रॅम किंमत ४२०००/-एक मोटर सायकल किंमत ६००००/-दोन मोबाईल किंमत ११०००/-असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. विचारपूस दरम्यान आरोपीने सोनाळा येथील एका जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपीकडून इतर गुन्ह्याची उकल बाबत तपास सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बुलढाणा विश्वजी पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी बी महामुनी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, गणेश पाटील, चांद शेख, पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ तारुळकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल पुंड यासह स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा व पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू आडवे, पोलीस कॉस्ट ऋषिकेश खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *