जामोद परिसरात अवैध वृक्षांच्या कत्तलीसह डिंक तस्करीला उधान

जामोद परिसरात अवैध वृक्षांच्या कत्तलीसह डिंक तस्करीला उधान अधिकाऱ्यांना फोन केला असते अधिकारी उत्तर देत नाही किंवा उडवावी ची उत्तरे देतात लवकरच भाग दोन मध्ये बातमी प्रकाशित होईल

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरागे

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जामोद वन जंगलातून सागवान सारखे मौल्यवान किमतीचे वृक्ष धामोडा सिसम बांबू सह इतरही मौल्यवान वृक्षांची अधिकाऱ्यांच्या संगनमताने दिवसाढवळ्या कत्तल करण्यात येत असल्याने लवकरच वनराईचे वाळवंटात रूपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सातपुडा पर्वतातील वन जंगलात अवैध वृक्ष तोडी सह डिंक तस्करीला सुद्धा उधान आले असुन मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांकडून अतिक्रमणे करून शेती काढण्यात येत आहे मात्र याकडे वन अधिकार्‍यांसह वन कर्मचार्‍यांचे साफ दुर्लक्ष होत आहे दिवसाढवळ्या सागवान सारख्या इतरही मौलवान किमतीचे वृक्षांची व सालाईच्या डिंकाची मोठ्या प्रमाणात वन अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने तस्करी सुरू आहे केवळ हप्ताखाऊन वनरक्षकच वनभक्षक बनत आहेत स्वतःची वर कमाई होण्यासाठी वन अधिकारीच अवैध वृक्ष तोडण्यास जणूकाही परवानगीच देत असल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच वन अधिकारी वृक्षतोडी करणाऱ्यांवर थातूरमातूर धाडी टाकून नॉर्मल केसेस भरतात मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडी कडे व डिंक तस्करीकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते जामोदचे वनपाल अतुल बळगुजर हे जामोदला रूजू झाले तेव्हापासून सततची दांडीच मारत असल्याने जामोद राऊंड चा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे जामोद राउंड चे वनपाल सह वनकर्मचारी जंगलात जाताना कधीच दिसून येत नाहीत नेहमी फॉरेस्ट च्या बंगल्यास कुलुपच लावलेले दिसून येते तर बहुतांश वनकर्मचारी हे मुख्यालयी न राहता जळगाव जामोद येथून ये-जा करतात जामोद राउंड मधील वन जंगलात मेंढपालांनकडून पैसे घेऊन मेंढ्या व शेळ्या सर्रास चारण्यास वनपालांनी जणू काही परवानगीच दिल्याचे बोलल्या जात आहे मात्र जामोद येथील शेळ्या-मेंढ्या व गुरांना वन जंगलात चराई करण्यास मनाई असते तसेच जामोद येथे दररोज सायकलिंनद्वारे पहाडातून जळतनाची लाकडे म्हणून अंजन खैर सिसमची साग सालय इत्यादी ओले झाडे तोडून आणून येथील हॉटेलांमध्ये तसेच गावात सायकलिंनद्वारे लाकडे देण्यात येत आहेत तसेच गावात 7ते 8 ठिकाणी अवैध रंदा मशीन सर्रासपणे चालताना दिसून येतात मात्र या सर्व प्रकारांकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे आता तरी संबंधित वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन जामोद परिसरात होत असलेल्या अवैध डिंक तस्करीसह अवैध वृक्षांच्या कत्तलीस आळा घालावा अशी मागणी जामोद येथील वृक्षप्रेमी जनतेकडून होत आहेफोटो :-1) सालाईच्या वृक्षांना अशा प्रकारे डिंक तस्कराकडून घाव घालून डिंक काढण्याच प्रकार या परिसरात सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *