
त्या’ अवैध बांधकाम विरोधात प्रहारचे १० फेब्रुवारीला गोट्या खेळा आंदोलन
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : नगर परिषदेची कोणीतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम केल्याप्रकरणी चाळीसबिघा परिसरातील शांती आरोग्यम् हॉस्पीटल एक महिन्याच्या आत जमीनदोस्त करण्यात यावे अशी नोटीस मुख्याधिकारी यांनी एक महिन्यापुर्वी दिली होती. त्यानंतर सुध्दा न. प. प्रशासनाने त्यावर कारवाई न केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने न. प. च्या निषेधार्थ १० फेब्रुवारी रोजी गोट्या खेळा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवदेन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना ३१ जानेवारी रोजी दिले आहे.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, चाळीसबिघा परिसरात असलेल्या डॉ. विकेश जैन (शांती आरोग्यम् हॉस्पीटल) यांनी नगर परिषदेची कुठलीही पुर्व परवानग न घेता अवैधरित्या भव्यदिव्य दवाखान्याचे बांधकाम केले होते. याबाबतची पराव्यासह तकार प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टपयांनी न.प. प्रशासनाला दिली होती. त्यावरून मुख्याधिकारी यांनी २७ डिसेंबर २०२४ रोजी संबंधित डॉक्टर जैन यांना एक महिन्याच्या आत सदर दवाखाना व करण्यात आलेले बांधकाम जमीनदोस्त करण्याची नोटीस बजावली होती. तरी सुध्दा न. प. प्रशासनाने पुढील कार्यवाही न केल्याने आता प्रहार जनशक्ती पक्षाने न. प. प्रशासना विरूध्द व अवैध बांधकाम करणाऱ्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द नगर परिषद कार्यालयातच १० फेब्रुवारी रोजी गोट्या खेळा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे.
