कु.प्रतिक्षा भिमानंद तायडे हिची आँक्सफर्ड लंडन येथे msc डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमासाठी निवड

कु.प्रतिक्षा भिमानंद तायडे हिची आँक्सफर्ड लंडन येथे msc डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमासाठी निवड…

जळगाव जामोद प्रतिनिधी...जळगाव जामोद येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कवी,गायक भीमानंद तायडे यांची मुलगी कु.प्रतिक्षा तायडे हिची ऑक्सफर्ड लंडन येथे msc डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमासाठी निवड झाली. कुमारी प्रतीक्षा तायडे हिचे जन्मगाव झाडेगाव असुन तिने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा झाडेगाव येथुन घेतले. व नंतर माध्यमिक शिक्षण डॉक्टर आंबेडकर विद्यालय जळगाव जामोद येथून घेतले तर महाविद्यालयीन शिक्षण दि.न्युईरा कॉलेज येथून घेतले. तर पदवी पर्यंतचे शिक्षण कला शाखेतील आबासाहेब करणारे महाविद्यालय पुणे येथे घेतले इंटरशिप प्रबुद्ध इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फलटण जिल्हा सातारा येथून घेतले.तिचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले व सर्व महापुरुष तसेच तिचे मार्गदर्शक शिक्षक आई-वडील व सर्व हितचिंतक. तिच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

2 thoughts on “कु.प्रतिक्षा भिमानंद तायडे हिची आँक्सफर्ड लंडन येथे msc डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमासाठी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *