कुणबी मराठा समाजाचा राज्यस्तरीय परिचय मेळावा मलकापूर येथे फेब्रुवारीमध्ये

कुणबी मराठा समाजाचा राज्यस्तरीय परिचय मेळावा मलकापूर येथे फेब्रुवारीमध्ये

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

कुणबी – मराठा समाजाचा राज्यस्तरीय उपवर वर युवक युवती परिचय मेळावा मलकापूर येथे आयोजन करण्याच्या अनुषंगाने आज 19 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह मलकापूर येथे अखिल भारतीय कुणबी महासंघ या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अमोल भाऊ टप यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवा पाटील गोंड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले
लग्न जोडण्याच्या पद्धतीमध्ये पारंपारिक पद्धतीसह आधुनिक पद्धतीचा अवलंब करून अधिकाधिक सोयीस्कर पद्धतीने सोयरीक जुडावी याकरिता सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन भव्य दिव्य असा वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्याबाबतचे चर्चा करण्यात येऊन जेणेकरून वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय टाळून समाज एक संघटित होण्यास मदत होईल..
याबाबत त्वरित ग्राम पातळीवर व शहरी विभागात वेगवेगळ्या आयोजन समित्या निर्माण करून सर्वसामान्य कुणबी मराठा बांधवांपर्यंत पोहोचून जनजागृती करत आधुनिक पद्धतीबाबत किंबहुना वधू-वर परिचय मेळाव्या बाबत अवगत करून लवकरात लवकर भव्य असा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा पुढील महिन्यात फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यामध्ये आयोजित करण्याबाबत बैठकीमध्ये ठरवण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवा पाटील गोंड, प्रदेश सचिव श्री प्रवीण भाऊ कान्हे, जिल्हाध्यक्ष श्री अमोल भाऊ टप, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष श्री राहुलभाऊ संबारे, अनिल भाऊ सरप, महादेव पवार, किसनराव कंकाळे, रामदास रोठे, विठ्ठल गावंडे, सचिन गायकवाड, वैभव पाटील, सुनिल बाबुराव संबारे, चंद्रकांत गावंडे, शरद मोरखेडे, तुकाराम कापडे, युवराज माताडे, यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *