
बेपत्ता ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला पाण्यावर तरंगताना…
जळगाव जामोद प्रतिनिधी- जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथील रहिवासी असलेले महादेव जगदेव दाभाडे वय ४५ वर्षे हे दिनांक २ डिसेंबर सोमवार रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास गावात जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेले असुन महादेव दाभाडे हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे वडील जगदेव दाभाडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली होती. दरम्यान आज ४ डिसेंबर रोजी सदर व्यक्तीचा मृतदेह गावानजीक पिंपरी नदीत तरंगताना एका शेतकऱ्याला दीसून आला…. ग्रामस्थांनी घटनेची माहिती जळगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला…महादेव दाभाडे यांना तीन मुली, एक मुलगा, पत्नी,आई,वडील असा आप्त परिवार असून त्यांच्या अचानक निघून जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अतुल मोहाळे हे करित आहे.
