देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा होताच जळगांवात जल्लो

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा होताच जळगांवात जल्लोष…

जळगाव जामोद प्रतिनिधी-राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने पक्षाच्या वतीने निवड झाल्याने महाराष्ट्रात सर्वदूर फटाके फोडत उत्सव साजरा करण्यात आला.जळगाव जामोद शहरातही भाजपा कार्याल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जंगी मिरवणूक काढत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, निलेशदादा शर्मा,शहराध्यक्ष कैलास पाटील, शिवसेनेचे संजय भुजबळ , डॉ.बगाडे, बाबा टावरी,रमेश कोथळकार, पंडित माटे,शरद खवणे,चोपडे,जेबी मिर्झा, अमोल दाभाडे,शूभम चंडाले सह भाजप महायुतीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *