जि.प. (मा.श) माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जि.प. (मा.श) माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी.जळगाव जा. येथील जिल्हा परिषद (मा. शा.) माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी सन 2000-2001 च्या इयत्ता 10 वी वर्गात शिकणाऱ्या सर्व माझी मित्र मैत्रिणींचा स्नेह मिलन कार्यक्रम दि. 05/11/2024 रोजी शाळेत आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थी एकत्र येऊन गेल्या तीन वर्षापासून स्नेह संमेलन कार्यक्रमाची परंपरा अघटीत सुरू आहे. दरवर्षी सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनुसया जाधव मॅडम, तर प्रमुख अतिथी मध्ये श्री इंगळे सर श्री नागेश्वर सर श्री गव्हाळ सर श्री चव्हाण सर काटे मॅडम वानखेडे शिपाईदादा, दुलंबे बाबूजी व नगरपरिषद शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक श्री सातो सर उपस्थितीत होते. सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या शाळेतील माजी विद्यार्थी विठ्ठल कोकाटे व त्यांच्या पत्नीने साडी चोडी देऊन खऱ्या अर्थाने भाऊबीजेची भेट दिली. या कार्यक्रमात त्यांच्या सहपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये काही ठराव पारित करण्यात आले. दरवर्षी एकत्र येऊन स्नेह मिलन कार्यक्रम साजरा करणे एकमेकांच्या सुख दुःखात आणि अडचणीमध्ये सहकार्य एका करण्याचे ठरविले आहे. योगायोगाने रेखा गवई या विद्यार्थिनीचा/ मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने बर्थडे केक आणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला कैलास धामणे, अमरदीप साळोकार, अशोक जोध, शेख आरिफ, महादेव जाधव, मनीष वाघ, शेख जब्बार, अशोक हागे, विठ्ठल सुरडकर, सुपडा तडवी यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आशा जाधव वर्षा बोरसे यांनी केले तर देवका मिसाळ, चित्र रेखा सनाणसे, रेखा गवई, सारिका, विद्या, संगीता, नंदा पुसे शालिनी कपलेआभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *