
खासदार बळवंत वानखेडे ह्यांनी “छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर मशीद झाली पाहिजे” ह्या संतापजनक वक्तव्याचा निषेध श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर अमरावतीचे विद्यमान खासदार बळवंत वानखेडे ह्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर मशीद झाली पाहिजे” ह्या संतापजनक वक्तव्याचा निषेधार्थ आज मलकापूर शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. डाव्या विचारसरणीच्या, जिहादी लोकांशी हातमिळवणी करून हिंदुत्व, हिंदुधर्म आणि शिवछत्रपतींच्या इतिहासाला चुकीच्या पद्धतीने कुणी मांडण्याचा प्रयत्न करत असेल, हिंदू समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे आम्ही कदापिही खपवून घेणार नाही शिवाय इथून पुढे अश्या प्रकारची वक्तव्य कुणीही केल्यास श्री
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही अश्या प्रकारच्या भावना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर विभागाचे विभाग प्रमुख श्री ओम शिंदे ह्यांनी व्यक्त केल्या. ज्यावेळी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर शहरात जागरूक मलकापूर कृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि सकल हिंदू समाजाकडून हिंदू स्वाभिमान मेळावा आयोजित केलेला करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सर्व हिंदू बांधवांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन ओम शिंदेंनी केले आहे. ज्यावेळी सर्व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर शहराचे अध्यक्ष श्री सागर उमाळे, तालुका अध्यक्ष श्री यशवंत थोरबोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
