
वारंवार तुटणाऱ्या 11 केवी तारांमुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका…गावाबाहेरून लाईन हटवावी:अन्यथा आंदोलन.
जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम खेर्डा बु या गावांमधून अनेक घरांवरून 11 केवी ही हाय व्होल्टेज लाईन गेलेली आहे सदर लाईनच्या तारा दोन वेळा तुटल्या आणि घरावर कोसळल्याने अनेक घरांमध्ये विद्युत करंट आला त्यामुळे कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तेव्हा सदर लाईन तात्काळ गावाबाहेरून हटवावी अन्यथा कुटुंबीयांसह वीज वितरण कंपनी कार्यालया मध्ये आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या संदर्भात आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सहाय्यक अभियंता वीज वितरण, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना निवेदन सादर करण्यात आले 21 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता माकडांच्या उड्यांमुळे सदर लाईनचे तार तुटून घरावर कोसळले तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता त्यामुळे तारा टिनाच्या घरांवर कोसळल्या आणि जोरात स्फोट झाल्यासारखे आवाज झाल्याने लोक घाबरले सुदैवाने जीवित हानी झाली नाही या अगोदर सुद्धा 21 जुलै रोजी रात्रीचे वेळी हे तार तुटले होते त्यामुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यानंतर थातूरमातूर जोडलेले तार आज पुन्हा तुटले आणि जनतेच्या जीवित धोका निर्माण झाला आहे तीन महिन्यात दोन वेळा तार तुटले. तेव्हा सदर लाईन सात दिवसाच्या आत मध्ये गावाबाहेरून हटवावी अन्यथा सर्व कुटुंबातील महिलांसह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी शहादेव राजनकर काशिनाथ वानखडे विजय म्हसाळ खंडूजी मदनकार सचिन वानखडे रामेश्वर भड रामकृष्ण बोचरे भाऊदेव वानखडे वासुदेव राजनकार जयदेव वानखडे पुंडलिक अडकने संजय जाधव गजानन म्हसाळ गुलाबराव इंगळे गोपाल निमकर्डे शहादेव तायडे जानराव आसलकार सुनील तायडे दशरथ सुरडकर योगेश निमकर्डे संतोष तायडे रामदास निमकर्डे गजानन मनसुटे अंबादास उमरकर सुनील म्हसाळ गणेश वसतकार नारायण तायडे प्रमोद उगले अनिल म्हसाळ प्रमोद वानखडे रवींद्र भोपळे यांच्यासह 50 नागरिक उपस्थित होतेचौकट:-वीज वितरण बघते मरणाची वाट…. वीज वितरण कंपनीला सदर लाईन हटवण्याबाबत वारंवार निवेदन देऊनही अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही गेल्या तीन महिन्यात दोन वेळा सदर लाईनच्या तारा तुटून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तेव्हा वीज वितरण कंपनीने जनतेच्या मरणाची वाट पाहू नये तर तात्काळ सदर लाईन हटवून गावकऱ्यांना सुरक्षित करावे अशा दुर्घटनेत नागरिकांच्या जीविताचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला.
