
त्रिमूर्ती प्रतिष्ठान येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोप”बुध्द नाही होता आले तरी बुध्दफुल बाणण्याचा प्रयत्न करा”.
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर :- मातोश्री भीमाई उपासिका संघ आणि त्रिमूर्ती प्रतिष्ठान बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण जे गेल्या तिन महिन्यांपासून धम्मकुटी मुंडगाव येथे सुरू होते. त्या ग्रंथ पठणाचा यथोचित समारोप आज अश्विन पौर्णिमा म्हणजेच वर्षावास निमित्ताने करण्यात आला.आषाढ पौर्णिमेला सदर ग्रंथाचे वाचन सुरू करण्यात आले होते. आषाढ ते अश्विन साधारणतः तिन महिन्याच्या ह्या प्रदीर्घ कालखंडात मुंडगाव रहिवासी आणि गावकरी वर्गानी सदर धम्मग्रंथ श्रवणाचा लाभ घेतला.या कालावधीमध्ये धम्म उपासक तथा सहाय्यक शिक्षक मनिष सरकटे यांनी सलग तिन महिने ह्या धम्मग्रंथाचे पठण करण्याचे कार्य केले.काल झालेल्या धम्मग्रंथ समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेहभोजनाचे आयोजन मातोश्री भिमाई उपासिका संघाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बुध्द धम्म पुजापाठाचे देखील आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी संपूर्ण गावातून मंगल मैत्री कँडल मार्च काढण्यात आला ज्यामध्ये सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तदनंतर धम्म सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये बुध्द जीवन आधारित नाटिका आणि गीत सादर केल्या गेले. ज्यामध्ये विशेष सहकार्य संजय फुरसुले, सुनिल कडू, गुणवंत लहाने आणि टी.जे.वानखडे सर यांचे लाभले. ह्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य सुष्मिताताई सरकटे आणि बहुजन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश सरकटे यांची उपस्थिती होती.धम्मदेसना देतेवेळी “बुध्द जरी होता आले नाही तरी बुध्दफुल होण्याचा प्रयत्न करावा म्हणजे बुध्द सुवास आयुष्यात दरवळेल. मानवी जीवनातील परमोच्च कल्याण प्राप्तीसाठी आणि परम आनंद प्राप्तीसाठी बुद्धाचा धम्म अतिशय प्रेरक आणि महाकल्यानकारी आहे. आणि हा धम्म श्रवण केल्यानंतर केवळ अनुकरणाने आपण शांती व कल्याण प्राप्त करू शकतो.” असे प्रतिपादन समारोपीय ग्रंथ वाचन करताना मनिष सरकटे यांनी काढले.यावेळी सर्व भिमाई उपासिका संघ महिला यांचेसह अध्यक्ष शेषराव सरकटे, सचिन सरकटे, रंजीत सरकटे, विकास सरकटे, दिलीप भरक्षे, बोधानंद आरख, राहुल सरकटे, बबन सरकटे, संदीप सरकटे भूषण रायबोले, हिरा सरकटे, बाळासाहेब सरकटे, केशव सरकटे, अनिल सरकटे, विलास सरकटे, सुमित सरकटे, संदीप सरकटे, सागर सरकटे पत्रकार स्वप्निल सरकटे यांचेसह सर्व समाज बांधव उपस्थित होता.
