
प्रतिनिधी मेहकर
मेहकर, विधानसभा निवडणूक कीच बिगुल वाजले असून, २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ तारखेला निकाल लागणार असून, सर्व रजकीय पक्ष कामाला लागले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलोरे चा नारा दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेत महायुतीला बिन शर्त पाठिंबा दिला होता परंतु विधानसभेत मात्र स्वातंत्र पणे महाराष्ट्र नवनिमणि सेना ही विधानसभा लढणार असल्याचे घोषित केले असून, मेहकर मतदार संघात सुद्धा उमेदवारी देणार असल्याचे मनसे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी पत्रकाराशी बोलताना जाहीर केले आहे.मागच्या वेळेस लोकसभेला महायुतीला बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मदत केली होती.मात्र, विधानसभेला एकला चलो च्या नाऱ्या मुळे महायुती ला फटका बसण्याचे चिन्ह दिसत आहेंत मेहकर मतदार संघात कोणत्या उमेदवार ला जड जाणार आहे हे लवकरच कळेल कारण मेहकर मतदार संघ राखीव असल्याने इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडणूक लढण्याच्या तयारीला आहेत. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्या वेळेस मेहकर मतदार संघात आपला उमेदवार विधानसभेसाठी उत्तरविणार आहे.
