जळगाव नगरीत पहिल्यांदाच रास गरबा दांडिया उत्सव

जळगाव नगरीत पहिल्यांदाच रास गरबा दांडिया उत्सव

प्रतिनिधी जळगाव जामोद
दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी सप्तशृंगी ग्रुप आयोजक सौ नीलिमा संजय शेळके व संजय पंजाबराव शेळके दंपत्याद्वारा रास गरबा दांडिया उत्सव हजार महिलांच्या उपस्थितीत हर्षोल्हासात साजरा झाला. सर्वप्रथम प्रसिद्ध कोरिओग्राफर श्री अमोल जाधव ए जे सर ज्यांना 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव असून , त्यांनी वर्कशॉप घेऊन 300 महिलांचा आठ दिवस सराव घेतला.


18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात ते दहा . पी. ए.मॉल हॉलमध्ये भव्य दिव्य समारोपिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोद शहरातील प्रसिद्ध महिला स्नेहाताई टापरे, अपर्णाताई कुटे,अनिताताई जयस्वाल, स्वातीताई वाकेकर ,सुनीताताई वाघ, गायत्रीताई विप्रदास ,मीनाताई डिडोळकर, सोनल ताई बन्साली, सुलोचनाताई शेळके उपस्थित होत्या. वय वर्ष आठ ते पंधरा ए ग्रुप, 15 ते 30 बी ग्रुप, 30 ते 45 सी ग्रुप व 46 च्या पुढे डी ग्रुप मध्ये स्पर्धेच आयोजन करण्यात आलं. प्रत्येक ग्रुप मधून प्रत्येकी चार बक्षीस व दहा प्रोत्साहन पर बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. ग्रुप ए मधून पूर्वी डुकरे, ध्रुवी भुते, आस्था अग्रवाल, चैताली चांडक, अरहम भन्साली.
ग्रुप बी मधून दिपाली मुलनकर, पूजा पवार, वैष्णवी ठोसर, अश्विनी राजपूत, सपना कावरे
ग्रुप सी मधून उज्वला विभाणी, कोमल सिरजोशे, लीना दीक्षित, प्रिया ठाकूर, कोमल जयस्वाल, पुनम जयस्वाल, मनीषा बंड,
ग्रुप डी मधून अर्चना गोदाणी, मंजुषा वानखडे, रेणुका दांडगे, लीना घोटेकर, चित्रलेखा राजवैद्य, सरोज छाजड यांनी बक्षीसं प्राप्त केली.
तसेच संपूर्ण कार्यक्रमातून एक सर्वोत्कृष्ट गरबाक्वीन म्हणून डॉक्टर सोनल झंवर यांची निवड करण्यात आली व त्यांना पी.ए. मॉल संचालक प्रमोद भन्साली द्वारा होम थिएटर बक्षीस देण्यात आले. सौ नीलिमा व श्री संजय शेळके द्वारे उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. जळगावत पहिल्यांदाच तीनशे महिला एकत्रित गरबा खेळल्या. एवढ्या मोठ्या कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल शेळके दांपत्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *