गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

हिवरखेड येथील अरुण वाकोडे (वय अंदाजे 44) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरुण हा हमालीचे काम आणि मेहनतीची कामे, मोल मजुरी करून आपला कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत होता. त्याला अनेक वर्षांपासून फिट या बिमारीचा त्रास होता. त्यामुळे तो मानसिकरित्या चिंताग्रस्त होता. त्यामुळे सततच्या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दिनांक 18 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी हिवरखेड येथील स्मशानभूमी रोडवर निंबाच्या झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी पंचनामा करून मृतकाला शवविच्छेदनासाठी (उत्तरीय तपासणीसाठी) तेल्हारा येथे पाठविले आहे. अरुण हा अत्यंत सुस्वभावी आणि आपल्या कामाप्रती तत्पर असल्याने गावातील नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांचा तो आवडता कामगार होता. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.*😔😔😔😔😔😔 *भावपूर्ण श्रद्धांजली*🌸🌸🌸🌸🌸🌸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *