भाजपा महायुतीसरकारची कामे, पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडा

हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन

प्रदेश प्रवक्त्यांच्या कार्यशाळेत राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशु त्रिवेदी, नामदार भूपेंद्र यादव यांचे मार्गदर्शनअकोलाकाँग्रेस सरकारच्या काळात देशात ठिकठिकाणी होणाऱ्या बॉम्बस्फोटांचे प्रकार आता थांबले आहेत. केंद्रातील एनडीए सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने देश आणि राज्याच्या विकासाचे, जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. प्रवक्त्यांनी आपल्या सरकारची कामे, पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशु त्रिवेदी यांनी गुरुवारी दिला. भाजपा प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या कार्यशाळेत खा. त्रिवेदी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय पर्यावरण मंत्री नामदार भूपेंद्र यादव, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल, आ. अतुल भातखळकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, राष्ट्रीय माध्यम समन्वयक के. के. उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. खा. त्रिवेदी म्हणाले की, विकास हा केंद्रबिंदू ठरवत भाजपा सरकारने देशात आणि राज्यात अनेक महत्वाचे, दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आहेत. जोपर्यंत प्रवक्ते आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण हे मुद्दे मतदारांसमोर मांडणार नाही तोवर ते तळागाळापर्यंत पोहोचणार नाहीत. मतदारांना सरकारची धोरणे कळण्यासाठी, पक्षाची बाजू व काम प्रभावीपणे मांडले पाहिजे. के. के. उपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की पत्रकारांशी बातचीत करताना आपण पक्षाच्या वतीने बोलत आहोत, याचे भान ठेवणे महत्वाचे असते. निवडणूक प्रचारादरम्यान प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियामार्फत सरकारच्या, पक्षाच्या कामांचा तपशील जनतेसमोर मांडता येईल, असे श्री. प्रेम शुक्ल यांनी सांगितले.भाजपा माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक आ. अतुल भातखळकर यांनी सांगितले की, प्रवक्त्यांनी सरकारने केलेली कामे प्रसारमाध्यमांच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवताना त्यासंदर्भात संपूर्ण अभ्यास करावा. पुढील एक महिना प्रचाराच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असून सर्व प्रवक्ते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी एकाच दिशेने नियोजनपूर्वक काम करावे, अशी सूचना प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. तर कार्यशाळाचे समापन केंद्रीय मंत्री नामदार भूपेंद्र यादव यांनी करून विजयाचे मंत्र प्रसिद्धी प्रमुख आणि प्रवक त्यांचे कर्तव्य व सरकारच्या कामकाजाची माहिती 16 सूत्र कार्यकर्त्यांना देऊन प्रसिद्धी प्रमुख हा भाजपाचा चेहरा असून या चेहऱ्याने विवेक आणि बुद्धीने संवाद आणि संपर्क च्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका व महायुतीने केलेले काम पोहोचवण्याची काम केले भाजपा प्रदेश माध्यमातूनाने मीडिया सेंटरने तिन्ही महायुतीचे चिन्ह लावून व सर्व नेत्यांचे चिन्ह लावून एक संदेश दिला की 288 जागा ही भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची असो या महायुतीच्या प्रत्येक उमेदवार आपण आहोत ही भावना सर्वापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने कामाला लागा विजय आपला आहे मध्य प्रदेश हरियाणा हे कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी जनतेचा विश्वास जिंकून विजय प्राप्त केला अनेक बसून फेक निगेटिव्ह पसरवत असतात त्यांची संख्या जास्त आहे त्याकडे लक्ष न देता जनतेशी संवाद साधा आपली भूमिका प्रसार माध्यमाचे वेगवेगळे संपर्क सूत्र साधून विजयी चा संकल्प घेऊन प्रसिद्धी प्रमुखाने व प्रवक्त्याने आपली कर्तव्य पार पाडावे असे आवाहन नामदार भूपेंद्र यादव यांनी केले. सुनी आणि हवा याचा संगम करून पक्ष सत्तेत येणार व महायुती ची पुन्हा महाराष्ट्रात सत्ता येणार आहे याची आपण भागीदार व्हा असे आवाहन त्यांनी केले यावेळी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया युट्युब चॅनेल यांच्या विषयी त्यांनी माहिती दिली परिचय आणि व्यक्ती यांची ओळख करून घेऊन प्रश्न उत्तर च्या माध्यमातून त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना मार्गदर्शन केले विदर्भातून विदर्भ प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी व एडवोकेट नेरलेकर तसेच अकोला जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी गिरीराज तिवारी, यांनी भाग घेऊन अकोला जिल्हा तसेच विदर्भाची माहिती दिली., सतत बत्तीस वर्षापासून प्रसिद्धी प्रमुख म्हणून गिरीश जोशी कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *