डॉक्टर आशिषसिंह राजपूत यांच्या संकल्पनेने सुनगावात भव्य रोग निदान शिबिर संपन्न…

जळगाव जामोद प्रतिनिधी-

सुनगांव येथील सराई महादेव मंदिरात जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ व डॉ.आशिषसिंह राजपुत तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ आक्टोंबर रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्वप्रथम आई भवानी व गावचे आराध्य दैवत श्री आवजीसिद्ध महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाशसिंह राजपुत,डॉ.आशिषसिंह राजपुत यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या रोगनिदान शिबिरातील सर्व औषधांचा खर्च डॉ.आशिषसिंह राजपुत यांनी केला.जवळपास गावातील ३०० नागरिकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.याठिकाणी मोफत ECG,कार्डीओग्राफ, रक्तदाब तपासणी, मुतखडा,मुत्रपिंडातील खडे, प्रोटेस्ट, पित्ताशय खडा, स्वादुपिंड, छोट्या गाठी,मुळव्याध,हायड्रोसिल, अंडाशय शस्त्रक्रिया,भगंदर, पायातील शिरा फुटणे या सह सर्वच रोगांचा इलाज याठिकाणी करण्यात आला.रुग्णांवर गोदावरी फाउंडेशन डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उपचार केले.डॉ.आशिषसिंह गोविंदसिंह राजपुत हे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.त्यांच्या या आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे गावकरी कौतुक करीत आहेत.. भव्य आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराला आशिष राजपुत,प्रकाशसिंह राजपूत , मोहनसिंह राजपूत, प्रेमसिंह ह. राजपूत, दीपक आकोटकर, त्रिलोकसिंह राजपूत, प्रवीणसिंह राजपूत , अनुपसिंह राजपूत, करणसिंह राजपूत ,स्वप्नील कपले, लोकेशसिंह राजपुत,किशोर राजपूत व समस्त जय भवानी दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य व बहुसंख्य गावकरी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *