जळगाव जामोद शहरामध्ये गणपती बाप्पाविसर्जन मिरवणुकीला गालबोट

जळगाव जामोद शहरामध्ये गणपती बाप्पा
विसर्जन मिरवणुकीला गालबोट

प्रतिनिधी जळगाव जामोद शहरामध्ये दिनांक 17 नोव्हेबर 2024 रोजी गणपती विसर्जन मिरवणूक चालू असताना संत रुपलाल नगर येथे, संत रूपलाल गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर रात्रीच्या वेळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान दगडफेक झाली यामध्ये अनेक नागरिकांना दगड विटांचा मार लागला काही जणांचे डोके फुटले काही घरांच्या दरवाजे खिडक्या तुटल्या अनेक नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या फोर व्हीलर गाड्या सुद्धा फोडल्या गेल्या यामध्ये काँग्रेसचे अर्जुन घोलप यांची सुद्धा चार चाकी गाडी फोडण्यात आली यामुळे पूर्ण जळगाव शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते झालेल्या घटनेमुळे जळगाव जामोद शहरातील हिंदू बांधवांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली व दोषींवर कारवाई करा असे म्हणने मांडले मात्र दोशींवर कारवाई न करता पोलीस प्रशासनाकडून उलट उपस्थित नागरिकांवरच लाठीचार्ज करण्यात आला यामध्ये बऱ्याच जणांना मोठ्या प्रमाणात मार लागल्याची चर्चा आहे. यानंतर बारा ते पंधरा गणेश मंडळांनी मिरवणुका ज्या जागेवर असतील त्या जागेवर उभ्या करून ठेवल्या व त्यांनी हट्ट धरला की जोपर्यंत आरोपीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही मिरवणुका जागेवरून हलवणार नाही. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी परिस्थिती आवाक्याबाहेर जात असल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस कुमक जळगाव शहरांमध्ये बोलावली. पोलीस प्रशासनाला जळगाव जामोद शहरामध्ये रात्रभर गणपती मंडळांना संरक्षण पुरवावे लागले आज दिनांक 18 नोव्हेंबर बुधवार रोजी बारा ते एक च्या दरम्यान गणपती मंडळाची मीटिंग घेऊन लवकरात लवकर दोषींवर कारवाई करू असे असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले दिलेल्या आश्वासनाचा आदर ठेवून सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुका सुरू करून श्री गणेशाचे विसर्जन केले. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आयुष स्वतंत्र प्रभार व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय कुटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून स्थानिक लोकांकडून सर्व घटनेचा आढावा घेतला व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन दोशींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यावेळी बजरंग दलाचे अमोल भाऊ अंधारे यांनी सुद्धा घटनेतील अन्यायग्रस्त लोकांच्या भेटीगाठी घेतल्या व दोशींवर कारवाईचे आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *