मलकापूर शहरात गळफास लावून 16 वर्षाचा मुलाची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर : येथील हनुमान नगर वास्तव्यास येथे असलेल्या दुर्गेश अतुल चोपडे (वय १६) याने आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज, २१ सप्टेंबर रोजी घडली. शहरात मागील काही दिवसां पासून आत्महत्येच्या घटना घडत आहेत. आज दुपारी १ वाजताच्यासुमारास हनुमान नगर येथे वास्तव्यास असलेल्या दुर्गेश चोपडे याने घरी कोणीही नसताना गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दुर्गेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, यांचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी मलकापूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *