महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेत शेकडो महिलांचा प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेत शेकडो महिलांचा प्रवेश

प्रतिनिधी अकोला -पक्ष अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याकरिता अकोला महिला जिल्हाध्यक्ष सौ.प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या जिल्हा संपर्क कार्यालय छ.शिवाजी नगर अकोला येथे जिल्हा संपर्क अध्यक्ष मा.श्री विठ्ठल लोखंडकार साहेब व रिटाताई गुप्ता यांच्या आदेशाने पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आले या वेळी अकोला शहरातील विविध भागातील शेकडो महिलांनी आज पक्ष कार्यालयात प्रवेश घेतला आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. प्रशंसा मनोज अंबेरे यांनी महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावू व महिलांच्या हिताचे व शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा व त्या योजना जनसामान्य महिला पर्यंत कशा पोहोचवाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सौ. रूपाली हेमंत गमे,सौ.भावना उमाळे, सौ.वैशाली उमाळे, श्रीमती अनिता दिगेकर , अरुणा उमाळे आदी महिला उपस्थित होत्या..जय महाराष्ट्र.. जय मनसे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *