तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करा मनसेची निवेदनाद्वारे मागणी..

जळगाव जा. प्रतिनिधी:-जळगाव जामोद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी,विदेशी दारू विक्री जोमात सुरू असुन अवैध दारू ही बऱ्हाणपूर मार्गे जळगाव जामोद शहरात येत आहे व हि दारु दलांच्या मार्फत तालुक्यातील काही खेडेगावातही दारू विक्री होत आहे. तसेच तालुक्यात खुल्लेआम तीन पत्ती जुगार, विमलगुटखा, , तसेच बरेच अवैध व्यवसाय चालू असुन यामध्ये खुलेआम विमल गुटखा सर्रासपणे दुकानांमध्ये उघड्यावर विकल्या जात आहे. तर दारू आणि जुगार ही राजरोसपणे जळगाव जामोद तालुक्यामध्ये सर्रासपणे चालू आहेत.जुगार खेळणाऱ्या चे तर मोठ मोठे क्लब दिवस रात्र चालू आहेत.या सर्व अवैध व्यवसायाला पोलीस प्रशासन जळगांव जामोद चे अभय असुन या सर्व प्रकाराची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून सर्व अवैध धंदे बंद करावे व अवैध धंदे करणान्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिनांक 1 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.तालुक्यातील चालु असलेले सर्व अवैध धंदे 7 दिवसात बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागेश भटकर हे 8 व्या दिवसापासून जळगाव जामोद पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करणार आहेत. याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा ईशाराच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगांव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *